रात्री झोपण्याअगोदर काही जरूरी नियमांचे पालन केले तर समजून घ्या की तुमचे वजन लगेचच कमी होण्यास मदत मिळेल. आमचे शरीर चरबी कमी करण्याचे काम नेमाने रात्र दिवस करत राहतो, म्हणून खाली दिलेले काही सोपे काम केल्याने नक्कीच तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळेल.
साखर आणि स्टार्चचे सेवन करणे टाळावे :
साखर आणि स्टार्च कार्ब्स असतात, जे की इंसुलिन निघण्याच्या प्रक्रियेला उत्तेजित करतात. इंसुलिन शरीरात मुख्य फॅट स्टोरेज हार्मोन असतो. जेव्हा इंसुलिनची मात्रा कमी असते, तेव्हा शरीर त्यात जमा फॅटला बर्न करणे सुरू करतो, म्हणून रात्री कार्बचे सेवन करणे टाळावे.
पूर्ण झोप घ्यावी :
अपुरी झोप तुमचे वजन वाढवते. झोपण्याअगोदर काही रिलॅक्सेशन टेक्नीकचा वापर करा, जसे ध्यान, हलके संगीत, गरम पाण्याने अंघोळ इत्यादी. चांगली झोप घेतल्याने शरीराचा मेटाबॉलिझम वाढतो आणि फॅट बर्न होतो. झोपल्यामुळे शरीरातील हार्मोन कंट्रोलमध्ये राहतात, ज्यामुळे सारखी सारखी भूक लागत नाही आणि शरीरातील ऊर्जा देखील कमी होत नाही.