याबाबत अधिक माहिती की, आकाश नावाच्या ग्राहकाने अरुण जैन या दुकानदाराकडून 17 ऑक्टोबर 2017 रोजी दोन रुमाल खरेदी केले होते. त्याबदल्यात त्याने दुकानदाराला दहा रुपयांची दोन नाणी दिली होती. मात्र ही नाणी आता चलनात नाहीत, असे सांगून दुकानदाराने ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला होता. वाद वाढल्यावर आकाश याने ही नाणी अजूनही चलनात आहेत आणि दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, असा मुरैनाच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे असे वारंवार सांगितले. मात्र एवढे सांगितल्यावरही दुकानदाराने त्याच्याकडून नाणी स्वीकारली नाहीत.