केरळमधील वन-विभागात काम करणारे अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबुक पोस्टमुळे ही घटना प्रसारमाध्यमांसमोर आली. मल्लपुरम जिल्ह्यातील एका गावात फटाक्यांनी भरलेलं अननस गर्भवती हत्तीणीला खायला देण्यात आलं. ते खाल्ल्यानंतर हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. हे फळ खाल्ल्यानंतर ते तिच्या पोटात फुटलं. यात हत्तीणीची जीभ आणि तोंडाला चांगलीच दुखापत झाली होती. या वेदनामुळे तिला काही खाता देखील येतं नव्हतं. नंतर ही हत्तीण वेलियार नदीच्या किनारी पोहचली आणि ती पाण्यात जाऊन उभी राहिली.