April Fool मूर्ख दिवस विशेष : का आणि कसा साजरा केला जातो, 5 खास गोष्टी

बुधवार, 1 एप्रिल 2020 (07:05 IST)
दरवर्षी 1 एप्रिलला लोकं एप्रिल फूल डे साजरा करतात. हा दिवस पाश्चात्य देशांमध्ये अधिक प्रमाणात साजरा होतो. त्याचे अनुसरण करून आता आपल्या भारतातही हा दिवस साजरा केला जात आहे, साजरे नव्हे बनवतात. इथे ह्याला फूल डे म्हटले जाते. हा फूल डे कसा बनवतात ते जाणून घ्या..
 
हा दिवस प्रथम कधी साजरा केला गेला हे काही स्पष्ट नाही. ह्याचा प्रारंभ 17 व्या शतकांपासून झाल्याचे मानत आहे. ह्याचा साजऱ्या करणाच्या संदर्भात काहीश्या आख्यायिका आहे. काही लोकांचा विश्वास आहे की फ्रांसच्या केलेंडर (दिनदर्शिकेत) बदल झाल्यामुळे हा दिवस साजरा होतो, काहींचा विश्वास आहे की रोम देशाचे नवीन वर्ष या दिना पासून सुरु होते. तर युरोपात 25 मार्च रोजी नवीन वर्षाच्या स्मरणार्थ सण साजरा केला गेला. पण १८५२ साली पॉप ग्रेगरी (8) ने ग्रेगरियन केलेंडर जाहीर केले. त्यावेळेपासून जानेवारीपासून नवीन वर्ष सुरु झाले. ह्या कॆलेंडरचा स्वीकार फ्रान्सने केला. पण युरोपातील बऱ्याच जणांनी ह्याचा स्वीकार केला नाही. कारण या संदर्भात काहीच माहिती लोकांना नव्हती. त्यामुळे जुन्या कॆलेंडरला मानणाऱ्या लोकांना नवीन केलेंडरला वापरल्या जाणाऱ्यांनी मूर्ख बनविण्यास सुरु केले आणि तेव्हापासून एप्रिल फूल बनवायची प्रथा सुरु झाली.
 
काही जण हिलरीया उत्सवाशी या दिवसाचा संबंध जोडतात. या उत्सवामध्ये अटीस या देवतांची पूजा करून विचित्र कपडे परिधान करून मुखवटे लावून विनोद करायचे. अश्या बऱ्याच आख्यायिका अजून आहे. 

कसे साजरे करावे...?
1 फूल डे किंवा एप्रिल फूल डे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. फ्रांस प्रमाणे रोम मध्ये हा 7 दिवस साजरा होतो. चीन मध्ये रंगहीन पाकिटं पाठवून तर जापान मध्ये पतंगांवर पुरस्कार लिहून मूर्ख बनविले जाते.
 
2 बऱ्याच ठिकाणी लोकं एकमेकांना खोटं बोलून घुबड (उल्लू) बनवतात किंवा काही वाईट गोष्टी करून एप्रिल फूल करतात. त्यांचा जीवनीशी करतात. हा दिवस जगभर मज्जा आणि हास्यांने साजरा केला जातो आणि एकमेकांना मूर्ख बनविले जाते.
 
3 एप्रिल फूल डे वर लोकं उपहास करून आणि अफवा पसरवूनही साजरे करतात. जे काही विनोद किंवा खोड्या केल्या जातात त्यांना एप्रिल फूल म्हणतात. लोकं आपल्या खोड्याना उघडकीस आणतात. एप्रिल फूल साजऱ्या करण्याचे कारण म्हणजे आपल्या परिचितांना त्रास न देता मज्जा करणे आहे.
 
4 या दिवशी लोकं आपल्या मित्रांना, शेजारच्यांना, परिवारातील सदस्यांना खोट्या माहिती देणं, खोट्या वस्तू देणे अश्या प्रकारे आनंदाने साजरे केले जाते. 
 
5 प्रत्येक जण कोणाला न कोणाला मूर्ख बनविण्यात लागलेला असतो. ह्या दिवशी प्रत्येक जण मूर्ख बनण्यापासून वाचण्याचा प्रयत्नांत असतो. म्हणून या दिवशी प्राप्त झालेल्या कुठल्याही महत्वाची माहितीवर गाम्भीर्याने चौकशी केली जात नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती