हाफ पँट, स्लीपर घातल्याने हॉटेलमधून बाहेर काढले

बुधवार, 11 जुलै 2018 (16:33 IST)
पुण्यात हॉटेलमध्ये आलेल्या तरुणांनी हाफ पँट आणि स्लीपर घातल्याने त्यांच्यावर हॉटेल प्रशासनाने त्यांना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. अशाप्रकारचे कपडे घालणे हॉटेलच्या नियमावलीत बसत नसल्याने या तरुणांना बाहेर काढण्यात आले. सेनापती बापट रस्त्यावरील ‘एजंट जॅक’ या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. 
 
हे तरुण मंगळवारी रात्री जेवण्यासाठी या हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी या मुलांनी हाफ पँट आणि पायात स्लीपर घातल्याचे कारण पुढे करत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याबाबत आपण आपल्या हॉटेलमध्ये नियमावलीही लावली असल्याचे हॉटेलच्या संचालकाने सांगितले. तुम्ही केलेला वेश आमच्या हॉटेलमधील सुविधा घेण्यास योग्य नसल्याने तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे सगळे तरुण संगणक अभियंते असून ते नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात. याबाबत चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित हॉटेल चालकांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी या तरुणांनी केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती