आता मोबाईल फोन आणि नोट सुद्धा सॅनिटाईझ केले जाऊ शकतात, DRDO ने विकसित केलं खास सिस्टम

शुक्रवार, 15 मे 2020 (12:29 IST)
डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने इलेक्ट्रॉनिक गॅझेट, नोट आणि कागदांना सॅनिटाईझ करण्यासाठी स्वचलित आणि संपर्कहीन अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझेशन कॅबिनेट विकसित केले आहे. 
 
देश कोविड -19 पासून मुक्त होण्याचे प्रयत्न करीत असताना DRDO ने पाऊल उचलले आहेत. 
 
डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटाईझर (DRUVS) तंत्र कॅबिनेटमध्ये ठेवलेल्या वस्तूंवर 360 अंशांनी अल्ट्राव्हॉयलेट किरणे टाकतात. वस्तू सॅनिटाईझ झाल्यावर हे आपोआप बंद होतं. संचालन करणाऱ्याला उपकरणांजवळ थांबण्याची किंवा उभे राहण्याची काहीही गरज नसते.
ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की ह्याला (DRDO) ने विकसित केले आहे. आणि कुठल्या ही संपर्काविना हे कार्य करतं. 
 
मंत्रालयाने म्हटले आहे की DRUVS ला मोबाईल फोन, आयपॅड, लॅपटॉप, नोट्स, चेक्स, चालान, पासबुक, कागदपत्रे, लिफाफे, या सर्व वस्तूंना संसर्गापासून मुक्त करण्यासाठी विकसित केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती