बीएमडब्ल्यूने जगातील पहिली स्वयंचलित बाईक अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सादर केली आहे. बीएमडब्ल्यूने या बाईकचे मोटोरेड आर 1200जी एस असे नाव ठेवले आहे. आतापर्यंत बीएमडब्ल्यूने आपल्या व्हिजनंतर्गत 3 विविध सेल्फ ड्रायव्हिंग कॉन्सेप्ट कार्स सादर केल्या होत्या. परंतु मोटोरेड याप्रकारातील पहिलीच बाइक आहे. जी चालकाशिवाय धावू शकते. आणि विशेष म्हणजे एक्सिलेटर आणि ब्रेक नियंत्रित करून स्वतः थांबू शकते. तसेच या बाइकवर मोशनलेस स्थितीत कोणी बसले असेल तरी देखील बाइक पडणार नाही. बीएमडब्ल्यूने या बाईकचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. मोटोरेडचे सेफ्टी इंजीनिअर स्टिफन हन्स यांनी व्हिडीओमधून बाईकच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे.