आवाज न करणारा कॉम्प्युटर

कॉम्प्युटर, लॅपटॉप सुरू होताना, बंद होताना तसेच वापरताना थोडाफार आवाज होतो. इस्रायलमधल्या कॉम्प्युटर बनवणार्‍या 'कॉम्प्यू लॅब' या कंपनीने लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणारा सायलंट मिनी कॉम्प्युटर बाजारात आणला आहे. या कॉम्प्युटरचा अजिबात आवाज होणार नाही. मिंट बॉक्स मिनी-2 या सिस्टिममध्ये कोणताही पंखा बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यातून कोणताही आवाज येण्याचा प्रश्नच नाही. यात मेटल हाउसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कॉम्प्युटर लवकर थंड होतो. तसेच 0 ते 45 अंश सेल्सियस तापमानातही व्यवस्थित काम करतो. या कॉम्प्युटरचे वजन अवघे 250 ग्रॅम आहे. यात क्वाड कोअर इंटेल सॅलरोन जे 3455 प्रोसेसर लावण्यात आला आहे. यात चार जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. यात दोन यूएसबी पोर्ट आहेत. तसेच दोन मिनी डिस्प्ले पोर्टही देण्यात आले आहेत. या कॉम्प्युटरची किंमत 23,900 रूपये असेल. याचा आकारही खूप छोटा आहे. त्यामुळे तो खूप कमी जागा व्यापेल. कोणताही आवाज न करता सुरू होणे हे या कॉम्प्युटरचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती