२९ डिसेंबरला ब्लॅक आऊट

गुरूवार, 13 डिसेंबर 2018 (09:09 IST)
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नव्या नियमानुसार २९ डिसेंबरपासून प्रत्येक वाहिनीसाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागणार असल्याने केबलचे दर वाढतील आणि ग्राहक डिश टीव्हीकडे वळतील. त्यामुळे या निर्णयाच्या निषेधार्थ २९ डिसेंबरला ब्लॅक आऊटचा घेण्यात आल्याची माहिती केबलचालकांच्या संघटनांनी दिली.
 
ट्रायच्या अधिकाऱ्यांसमोर केबल व्यावसायिकांनी ही नाराजी मांडली असून मध्यममार्ग काढण्याची मागणी केली आहे. प्रत्येक वाहिनीसाठी स्वतंत्र पैसे आकारून दरवाढ करायची आणि केबल व्यावसायिकांना या व्यवसायातून हटवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केबल व्यावसायिकांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती