अलीकडेच एका संशोधनात कळून आले की दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये विकले जाणारे सॅनिटाइझर बनावटी आहेत किंवा त्यापासून आरोग्याला धोका आहे. तसेच ऑक्सीमीटरचे देखील हेच हाल आहेत. दुकानांमध्ये बनावट ऑक्सीमीटर धडल्याने विकले जात आहे. दरम्यान सरकारने ऑक्सीमीटर मोबाइल अॅपबद्दल देखील लोकांना सतर्क केले आहे.
आपण हे जाणून हैराण व्हाल की बाजारात असे ऑक्सीमीटर उपलब्ध आहेत जे फोल्ड पेपर, टूथ ब्रश, पेंसिल इतर वस्तूंमध्ये देखील ब्लड ऑक्सिजन लेवल दर्शवत आहे. अशात ऑक्सीमीटर आपल्यासाठी प्राणघातक ठरू शकतं. अश्या ऑक्सिमीटरमध्ये आधीपासूनच ऑक्सिजन रीडिंग फीड केली गेली असते.