मध्य प्रदेशात जन्माला आली हात नसलेली मुलगी

मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (16:40 IST)
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात एक अशी मुलगी जन्माला आली आहे जिला एकही हात नाही.डॉक्टर सांगतात की अशी केस लाखात एक येते. मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. तिचे वजन 2 किलो 800 ग्रॅम आहे. प्रसूतीच्या वेळी अनुवांशिकतेमुळे किंवा संसर्गामुळे असे मूल जन्माला आले असावे. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुलीच्या जन्मामुळे कुटुंबातील सदस्य खूप आनंदात आहेत. ते म्हणाले की, देवाने आपल्याला जे काही दिले आहे त्यात आपण आनंदी आहोत. 
 
पलसूदजवळील उपळा आरोग्य केंद्रात जन्मलेली ही मुलगी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. लोक तिला भेटायला येत आहे. मुलीचे वडील नितेश यांनी सांगितले की,काही जण फोन करून मुलीबद्दल विचारपूस करत आहेत. 
 
मुलीच्या वडिलांनी सांगितले की 1 डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नीची सामान्य प्रसूती झाली. मुलगी जन्माला आली तेव्हा तिला हात नसल्याचे आढळून आले. पण आम्हाला याचे  काहीही दुःख नाही. आमची मुलगी आमच्यासाठी देवी लक्ष्मी मातेचे रूप आहे. देवाने आपल्या मुलीला जे काही बनवले आहे, त्यातच ते आनंदी आणि समाधानी असल्याचे नितेशने सांगितले.  

डॉ.सांगतात की, अशी प्रकरणे लाखात एक येतात. प्रसूतीच्या वेळी अनुवांशिक किंवा संसर्गामुळे मुलाचा असा जन्म झाला असण्याची शक्यता आहे.
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती