भाजप नेते वरुण गांधी यांच्या सभेत त्यांचा सभा मंडप आज अचानक कोसळला. यात ते बालंबाल बचावले.
वरुण यांच्या बिहौतुरा भागातील सभेत ही घटना घडली. वरुण सभामंडपावर आल्यानंतर त्यांच्याशी हस्तोंदलन करण्यासाठी त्यांच्या अनेक समर्थकांनी व्यासपीठावर गर्दी केल्याने व्यासपीठच कोसळले.
वरुण यांच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यात आल्याचे आदेश मिळाल्यानंतर त्यांच्या सभेत ही बातमी पसरल्यानंतर वरुण यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी गर्दी केल्याने हे व्यासपीठ कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.