भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर पीएम इन वेटिंग म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले जात असतानाच मोदी यांनी मात्र आपण या स्पर्धेत नसल्याचे प्रथमच जाहीर केले आहे. आपल्या आयुष्याचे एकच मिशन असून, याला त्यांनी ' नो एंम्बिशन' असे नाव दिले आहे.
भाजप नेते अरुण शौरी आणि जेटली या दोन नेत्यांनी सर्वप्रथम मोदी हे अडवाणींनंतरचे पीएम इन वेटिंग असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजप या पदासाठी अनेकांनी आपली दावेदारी ठोकली. स्वतः अडवाणींना ही बाब इतकी खटकली की त्यांनी मोदींना स्पर्धा देण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांचे नाव यात पुढे ढकलले.
या वादावर आता मोदींनीच पडदा टाकला असून, गुजरातचा विकास वगळता आपले कोणतेही उद्दिष्ट नसल्याचे त्यांनी एका खाजगी वाहिनीली दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.