मनोहर जोशींचे विधान गोंधळ उडविणारे- गडकरी

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सरकार बनविण्याइतके संख्याबळ लाभले नाही, तर मराठीच्या मुद्यावर आम्ही शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ, असे सांगणारे शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. जोशी यांचे हे विधान गोंधळ उडवून देणारे आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी यांनी म्हटले आहे.

जोशी यांचे विधान गैरसमजूतीतून आले आहे. पण त्यामुळे लोकांत व पक्ष कार्यकर्त्यांतही गोंधळ उडतो, असे गडकरी म्हणाले.

शिवसेना-भाजप युतीला राज्यात ४८ पैकी ३० जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर सदाशिवराव मंडलीक व कॉंग्रेसचे सांगलीतील बंडखोर उमेदवार अजित घोरपडे हे जिंकतील, असा भाजपचा अंदाज आहे. भाजपचे नेते या दोघांच्या संपर्कात असल्याचे गडकरी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा