मतमोजणीस कडक बंदोबस्तात सुरुवात

पंधराव्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या पाचव्‍या टप्‍प्‍यासाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्‍यासाठी निवडणूक आयोगाने व्‍यापक तयारी केली आहे.आज पहाटे आठ वाजेपासून लोकसभेच्‍या 543 जागांसाठी मतमोजणी करण्‍यासाठी देशभरात सुमारे 1080 मतमोजणी केंद्र उभारण्‍यात आले आहेत.

मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून 4260 सभागृहांमध्‍ये ही मोजणी केली जात आहे. मतमोजणीच्‍या कामासाठी सुमारे 60 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस सुरूवात झाली आहे.

मतमोजणीच्‍या प्रत्येक टेबलवर मायक्रो आब्जर्व्‍हर म्‍हणून भारत सरकारचा एक अधिकारी नियुक्त करण्‍यात आला असून तो मतमोजणी प्रक्रिया निष्पक्ष आणि सुरळीत होण्‍यासाठी त्‍याकडे लक्ष ठेवून आहे. मतमोजणी केंद्रांवर व्‍हीडिओ शुटींगही करण्‍यात येणार आहे.

निकाल लवकरात लवकर कळावे यासाठी आयोगाने एक सॉफ्टवेअर विकसित केले असून निकालांसाठी एक विशेष वेबसाइटही तयार करण्‍यात आली आहे. निवडणुकीचे निकाल तत्काळ कळण्‍यासाठी http://in.webdunia.com/marathi/election/ElectionMap.aspx या बेबसाईवरही खास सोय करण्‍यात आली आहे. राज्यभरासह देशभरातील निवडणुकीचे निकाल या वेबसाईटवरून पाहता येणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा