'धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र पंतप्रधानांनी देऊ नये'
मी धर्मनिरपेक्ष आहे, किंवा नाही यासाठीचे सर्टीफिकीट मला पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देण्याची गरज नाही, असा हल्ला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मनमोहन सिंह यांच्यावर केला आहे. रालोआला पाठिंबा दिल्या प्रकरणी पंतप्रधानांनी नितीश कुमार यांच्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
नितीश कुमार म्हणाले, की डॉ. सिंह हे पंतप्रधान आहेत. त्यांना धर्मनिरपेक्षता विद्यापीठाच्या कुलगुरूंसारखी वर्तणूक करण्याची गरज नाही. मनमोहन सिंह यांनी प्रमाणपत्र वाटत बसे नये.