स्लमडॉग मिलेनियरच्या जय हो...गीतावर आधारीत तयार केलेले गाणे कॉंग्रेसने आपल्या प्रचारातून मागे घेतले आहे. कॉंग्रेसचे मिडीया विभागाचे प्रमुख वीरप्पा मोईली यांनी यास दुजोरा दिला.
मोईली यांनी सांगितले की, मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या 'शायनिंग इंडिया'चा झालेला उलट प्रभाव पाहून हे गीत आम्ही मागे घेतले नाही. सध्या काही काळासाठी हे गीत मागे घेतले असून दुसर्या विषयावर आधारीत प्रचार अभियानाचा वापर केला जात आहे.
ऑस्कर पुरस्कार मिळालेले या गीताचे हक्क कॉंग्रेसने विकत घेतले होते. भाजपने कॉंग्रेसच्या गीताचे विडंबन 'भय हो...' हे गीत तयार केले होते.