कॉंग्रेस थींक टँकसह सोनियांची चर्चा

86 जागांवर मतदानाचा अखेरचा टप्‍पा पूर्ण होताच कॉंग्रेसने सहकारी पक्षांशी चर्चा करण्‍यास सुरूवात केली असून आघाडीच्‍या राजकारणासंदर्भात कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्‍या ज्येष्‍ठ विश्‍वासू सहका-यांशी चर्चा करण्‍यास सुरूवात केली आहे.

या संदर्भात पक्षाच्‍या प्रमुख नेत्‍यांची दिल्लीतील 15 रकाबगंज रोडवरील वॉर रूममध्‍ये बैठक झाली. यावेळी सोनियांचे राजकीय सल्‍लागार अहमद पटेल आणि परराष्‍ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांच्‍या व्‍यतिरिक्त पक्षाचे सर्व महासचिव उपस्थित होते.

या बेठकीनंतर सोनियांनी सरकारमधील सहकारी पक्ष राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार, समाजादी पक्षाचे नेते मुलायम सिंह व राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्‍याशी फोनवरून चर्चा केली.

वेबदुनिया वर वाचा