राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपतिपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर प्रथमच आपल्या मतदानाचा अधिकार राजधानी दिल्लीत बजावला.
यापूर्वी त्या जळगावात मतदान करत, परंतु आज त्यांनी राष्ट्रपती भवन परिसरातील सर्वोदय विद्यालयात आपल्या परिवारासह मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी आपले ओळखपत्र प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले.