भागलपुर दंगलीत अडवानींचा हात-लालू

बिहारमधील भागलपुरमध्ये झालेल्या दंगलीत भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांचा हात होता. त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.

येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या दंगलीच्या चौकशीसाठी नियुक्त केलेला आयोग प्रत्यक्षात बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी अडवानी यांना वाचविण्यासाठी स्थापन केल्याचेही ते म्हणाले. अडवानी या दंगलीत सामील असल्याचे पुरावे व कागदपत्रे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.

नितिश कुमार यांच्या कार्यकाळातच औरंगजेब नावाच्या युवकाला भागलपुरमध्ये बेदम मारहाण करण्यात आली होती. या दंगलीतील आरोपी कामेश्वर यादव हा नितिश कुमार यांच्या अगदी जवळचा आहे, अशी माहिती त्याने दिली होती.

वेबदुनिया वर वाचा