प्रारंभिक निष्कर्षानुसार कॉंग्रेस आघाडी पुढे

लोकसभा निवडणुकीच्या निकालातून कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच सरकार स्थापन करू शकेल असे स्पष्ट होते आहे. सध्या तरी कॉंग्रेस आघाडीवर असून भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची कामगिरी निराशाजनक होत आहे.

प्राथमिक निकालानुसार, कॉंग्रेस आघाडी २२५ जागांवर, भाजप १४० जागांवर आघाडी आहे. डावी आघाडी जेमतेम वीस जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष ८८ जागांवर आघाडीवर आहेत.

एक्झिट पोलला खोटे ठरविणारे निकाल येत आ हे. दिल्ली व राजस्थानात कॉंग्रेसची कामगिरी सुधारली आहे. मध्य प्रदेश व पंजाबमध्येही कॉंग्रेस चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीहून, राहूल गांधी अमेठीतून, लालूप्रसाद यादव सारण व पाटलीपुत्रा या दोन्हीतून, भाजप अध्यक्ष राजनाथसिंह गाझियाबादमधून आघाडीवर आहेत.

अजमेर शरीफमधून कॉंग्रेसचे सचिन पायलट, ग्वाल्हेरमधून ज्योतिरादित्य शिंदे, शिवगंगा येथून पी. चिदंबरम आघाडीवर आहेत. भाजप नेते जसवंतसिंहही दार्जिलिंगमधून आघाडीवर आहेत. दक्षिण कोलकतामधून ममता बॅनर्जी पुढे आहेत.

कर्नाटकमधील उत्तर कन्नडमधून कॉंग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा पिछाडीवर आहेत.

वेबदुनिया वर वाचा