पैसे वाटपाप्रकरणी प्रकाश झा अटकेत

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांना मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. श्री. झा लोकजनशक्ती पक्षातर्फे पश्चिम चंपारण मतदारसंघातून उमेदवार आहेत. त्यांच्या घरातून सव्वा दहा लाख रूपयेही जप्त करण्यात आले आहेत.

मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आ ला आहे. पश्चिम चंपारण जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक के. एस. अनुपम यांच्या पथकाने झा यांच्या गेस्ट हाऊसवर पहाटे छापा टाकला आणि पैसे जप्त केले, तसेच झा यांच्यासह २९ जणांना अटक केली. त्यांनतर त्यांना वैयक्तिक जाचमुचलक्यावर सोडून देण्यात आले.

हे पैसे वाटण्यासाठी आणल्याचा झा यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना इन्कार केला. हे पैसे मौर्य साखर कारखान्याजवळ असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले होते. कारखान्याची इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. तेथील मजूर व इतर कर्मचार्‍यांना त्यांचे पगार देण्यासाठी हे पैसे ठेवले होते, असे स्पष्टीकरण झा यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री नितिश कुमार व उपमुख्यमंत्री सुशील कुमार झा हे या कारवाईच्या माध्यमातून सूड उगवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा