कॉग्रेस आघाडीतील पंतप्रधानपदाची जागा केव्हाच भरली असल्याने पक्षात या जागेसाठी नो व्हॅकेन्सी असून मनमोहन सिंग हेच योग्य उमेदवार असल्याचे कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपले नाव नाहक यात गोवण्यात येत असून, आपण या पदासाठी इच्छुक नसल्याचे राहुल म्हणाले.
या प्रसंगी राहुल यांनी भाजपवर आणि पक्षाच्या धोरणांवर जोरदार टीका केली. देशात जोपर्यंत गरिबी आहे तोपर्यंत भारत उदय झाला असे आपण मानणार नसल्याचे ते म्हणाले.