पंतप्रधानदासाठी अद्याप अनुनभवी- राहूल गांधी

कॉंग्रेसची नेतेमंडळी राहूल गांधींना पंतप्रधान बनविण्यास उतावीळ झाली असली, तरी खुद्द राहूल यांनी मात्र आपण आत्ता या पदासाठी पात्र नसल्याचे म्हटले आहे. या पदासाठी लागणारा अनुभव आपल्याकडे आत्ता नाही. त्यामुळे या पदाविषयी विचारल्यास त्याला नकार देऊ, असे त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना पंतप्रधानपदाच्या मुद्यावरच बोलायला भाग पाडले. पण राहूल यांनी या पदासाठी लागणारा अनुभव आत्ता आपल्याकडे नसल्याने हे पद आपण स्वीकारणार नाही, असे निःसंदिग्धपणे स्पष्ट केले.

सध्या आपण युवक कॉंग्रेसला गरीबांसाठी काम करण्यास मजबूत करत आहोत. त्याची फळे पंजाब व गुजरातमध्ये मिळत आहेत, असे ते म्हणाले.

सुरक्षा यंत्रणा भेदून लोकांना जाऊन भेटण्याविषयी सांगताना, आपण सुरक्षा वर्तुळ भेदले नव्हते, असे स्पष्ट करून लोकांना भेटायला मला आवडते, असेही त्यांनी नमूद केले.

वेबदुनिया वर वाचा