तिसऱ्या आघाडीचेच सरकार बनणार- बुद्धदेव

लोकसभा निवडणुकांमध्ये कॉग्रेस आणि भाजपला आपला पराभव समोर दिसत असून, या निवडणुकांमध्ये तिसऱ्या आघाडीलाच बहुमत मिळेल आणि आघाडीचेच सरकार सत्तेवर येईल असा विश्वास पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी व्यक्त केला आहे.

माकपला या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळणार असून, माकपच्या मदतीनेच तिसऱ्या आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा