कॉग्रेस सरकार स्थापनेचा दावा करणार

देशातील बहुतांश राज्यामध्ये कॉग्रेस आणि सहकारी पक्षांना स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाल्याने संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.

दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू यासह अनेक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात कॉग्रेसला बहुमत मिळाले असून, पक्षाचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत.

यानंतर दहा जनपथ आणि देशभरातील कॉग्रेस मुख्यालयात दिवाळी साजरी करण्यात येत असून, पक्षातील नेत्यांनी सरकार स्थापण्याची तयारी सुरू झाल्याचे म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा