[$--lok#2019#state#maharashtra--$]
मुख्य लढत : संजय जाधव (शिवसेना) विरुद्ध राजेश विटेकर (राष्ट्रवादी)
शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणीमध्ये विद्यमान संजय जाधव यांना पुन्हा एकदा मैदानात उतरविण्यात आले आहे. संजय जाधव हे कट्टर शिवसैनिक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश विटकर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने राजेश विटेकर यांना उमेदवारी देऊन शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. ते गंगाखेड बाजार समितीचे पाच वर्षे सभापती होते. दहा वर्षांपासून ते सोनपेठ बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांचे वडील उत्तमराव विटेकर हे १९७८ मध्ये समाजवादी काँग्रेसकडून विजयी झाले होते. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात. स्वतः विटेकर हे तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.सध्या त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत.
[$--lok#2019#constituency#maharashtra--$]
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.