मुख्य लढत : धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध राजू शेट्टी (स्वाभिमानी)
राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आहे. राजू शेट्टी हातकणंगले मतदार संघातून दोन वेळा खासदार झाले. १५ व्या आणि १६ व्या लोकसभा निवडणुकीतून ते खासदार म्हणून निवड आले. कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये शेती व्यवसाय केला जातो. या भागात प्रामुख्याने ऊसाची शेती केली जाते. खासदार राजू शेट्टी यांनी वारंवार ऊस आणि दूधाला चांगली किंमत मिळावी यासाठी लढा दिला. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे शेतकरी त्यांच्यासोबत आहे. २००९ साली राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांचा पराभव करत खासदार झाले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत देखील ते विजयी झाले. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँगेसने राजू शेट्टी यांना लोकसभा निवडणूक २०१९ साठी पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात राजू शेट्टी यांची ताकद अधिक वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.