या मतदार संघात थोरत-विखे गटाचा प्रभाव आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून सदाशीव लोखंडे, तर काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे रिंगणात आहेत. मात्र नगरमधील प्रसिद्ध थोरात-विखे वाद या मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसेल. कारण मुलासाठी नगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने विखे पाटील नाराज आहेत. विरोधी पक्षनेते पदाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांची नाराजी शिर्डी मतदारसंघातील निकालातून दिसून येईल का आणि थोरात आपली किती ताकद पणाला लावणार, हेही पाहावे लागणार आहे.