मुख्य लढत : राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
शेवाळे यांनी 2014च्या मोदी लाटेत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा एक लाख 38 हजार 180 मतांनी पराभव केला होता. आता या दोघांमध्येच पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. गायकवाड यांच्या कन्या माजी मंत्री वर्षा गायकवाड या सदर मतदारसंघातील धारावीच्या आमदार आहेत.
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.