उत्तर मुंबई लोकसभा निवडणूक 2019

शनिवार, 4 मे 2019 (14:39 IST)
मुख्य लढत : गोपाळ शेट्टी (भाजप) विरुद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)
उत्तर मुंबईत नेहमीच धक्कादायक निकाल पाहायला मिळतात. एकेकीकाळी या मतदारंसघातून भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा अभिनेता गोविंदा याने पराभव केला होता. गेल्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना पराभूत करत, भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी विक्रमी फरकाने विजय मिळवला होता. यंदा काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर रिंगणात आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांना तोडीस तोड टक्कर आहे.

लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती