म्हणून कतरीना नंबर वन

IFMIFM
बॉलीवूडमध्ये सध्या 'नंबर वन' असणारी कॅटरीना कैफ आपल्या कामाबाबत इतकी गंभीर आहे याची प्रचिती सुभाष घई यांच्या 'युवराज' च्या शूटिंगवेळी आली.

ऑस्ट्रे‍लिया येथील शो-पीस आणि ज्वेलरीच्या शोरूमनजीक शूटिंग सुरू असताना सर्वांचे लक्ष शोरूममधील ज्वेलरीकडे लागून राहिले होते. पण, कॅटरीना आपल्या कामात तल्लीन होती. हे पाहून इतर सा-यांनी तिची खेचण्यास सुरुवात केली.

एकाने तिला विचारले, तू येथील कोणकोणते दागिने खरेदी करणार आहेस? पण, कॅटरीना काहीच उत्तर न देता आपल्या कामाकडे निघून गेली. विशेष म्हणजे शूटिंगवेळी तिचे त्या दागिन्यांकडे एकदाही लक्ष गेले नाही.

तिच्याजागी दुसरी कोणती नायिका असती तर ती शूटिंग सोडून नक्कीच शॉपिंग करत असती. पण, कॅटरीनाने तसे केले नाही. कामाच्या बाबतीत तिचा प्रामाणिकपणा पाहून भारावलेल्या सदस्यांनी तिला त्याच शोरूममधील एक गिफ्ट दिले.

वेबदुनिया वर वाचा