बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफचा आज वाढदिवस आहे. कतरीनाने आपला मागील वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा केला होता पण या वेळेस कतरीना स्पेनमध्ये जोया अख्तरचे चित्रपट जिंदगी मिलेगी न दोबाराच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे या वेळेस ती घरी जाऊ शकणार नाही.
दोन वर्ष अगोदर कतरीनाने मुंबईमध्ये आपला वाढदिवस साजरा केला होता आणि सलमान खानने दिलेल्या त्या पार्टीत बरेच काही घडले होते. पार्टीत आलेल्या शाहरुख खान सोबत वाद विवाद झाल्यामुळे कतरीनाचे मन खिन्न झाले होते. त्या घटनेनंतर कतरीनाने आपला वाढदिवस मुंबईमध्ये न राहता आपल्या घरी लंडनला जाऊन साजरा केला होता आणि या वर्षीसुद्धा कतरीना मुंबईमध्ये न राहून शूटिंगमध्ये व्यस्त आहे असे कारण सांगितले आहे, कारण जे काही असो ते फक्त कतरीनाच सांगू शकते पण आपण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.