कारगिल युद्धातील एक आणखी नायक म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा. शेरशहा असे त्यांना हाक मारण्यामागे निश्चितच त्यांचा सिंहा इतका शुरपणा. केवळ दीड वर्षांपूर्वी भारती सैन्यात सामील झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी कारगिलचे पहिले शिखर जिंकले तेव्हा पुढे काय असे विचारल्यावर जेवढं जिंकलं तेवढं पुरेसं नाही आणि ये दिल माँगे मोअर अशी प्रतिक्रीया त्यावेळी कॅप्टन बत्रा यांनी दिली होती.
6 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात पॉइंट 5140, पॉइंट 4875, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला. ते भारतीय स्थल सेनेतील 13 वी बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कॅप्टन पदावरील अधिकारी होते.