सुरुवातीला व्हॉट्सअॅपने फक्त मेसेजची सुविधा उपलब्ध करुन दिला होता. मात्र, त्यानंतर हळू-हळू फोटो, ऑडिओ क्लिप आणि पीडीएफ फाईल शेअर करण्याची सुविधा दिली. याचबरोबर पीडीएफनंतर सीएव्ही, डॉक, पीपीटी, पीपीटीएक्स, आरटीएफ, टीएक्सटी आणि एसएसएस यांसारख्या फॉरमॅटच्या फाईल्स पाठविण्याचे फिचर्स दिले आहेत.
आयफोन मोबाईल युजर्स व्हॉट्सअॅपवरुन 128 एमबीपर्यंत फाईल्स पाठवू शकतात. तर, अॅन्ड्राईड मोबाईल युजर्स 100 एमबीपर्यंतची फाईल पाठवू शकतात. त्याचबरोबर व्हॉट्सअॅप वेबवरुन फक्त 64 एमबीपर्यंत फाईल्स पाठविण्याची मर्यादा ठेवली आहे.