अनावश्यक कॉल्स रोखण्यासाठी ट्रायकडून नवे अॅप

बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (09:22 IST)
अनेक वेळा आपल्या मोबाईलवर कधीही अनावश्यक कॉल्स येतात.या त्रासदायक कॉल्सपासून सुटका होणार आहे. केंद्र सरकारने नवी अॅपची निर्मिती केलेय. उमंग व्यासपीठावर डीएनडी २.० नावाचे अॅप ट्रायकडून सादर करण्यात आलेय. आणखी १०० हून जादा सुविधाचा या अॅपमध्ये समावेश करण्यात आलाय. ट्रायने मागील वर्षी 'माय स्पीड' आणि 'माय कॉल' या नावाvs अॅप लॉच करण्यात आले होते. 
 
प्लेस्टोअवर जाऊन हे नवीन अॅप डाऊनलोड करा आणि आपल्या मोबाईलमध्ये या सुविधेचा वापर करा. त्यामुळे अनावश्यक कॉलपासून सुटका होणार आहे, असे लाँचिंग दरम्यान ट्रायकडून सांगण्यात आले. उमंग या व्यासपीठावरुन हे अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती