सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर चिनीच

जगातले सर्वाधिक वेगवान व अचूक महासंगणक म्हणून आजही दोन चिनी सुपर कॉम्प्युटर्सच कायम राहिले असून जगातील वेगवान महासंगणकांची यादी जर्मनी व यूएसने प्रकाशित केली आहे. या यादीनुसार चीनचे सनवे ताहुलाईट व तिन्हे 2 हेच जगातले सर्वात वेगवान असे पहिल्या व दुसर्‍या नंबरचे महासंगणक आहेत. सेमी अॅन्युअल टॉप 500 सुपर कॉम्प्युटरची ही यादी संशोधकांनी तयार केली आहे.
 
चीनच्या सनवे व तिन्हे नंतर तीन नंबरवर स्विस पिझ डेंट आहे तर अमेरिकन टायटन चौथ्या नंबरवर आहे. सनवे गेल्या जूनपासून टॉपवर असून त्याने तिन्हे 2 ला मागे टाकत हे स्थान मिळविले आहे. तिन्हे गेली तीन वर्षे ‍पहिल्या स्थानावर होता.
 
सनवे ताऊलाईटची क्षमता 93 पेटाफ्लॅक्सचा असून त्याचे प्रोसेसर संपूर्णपणे स्वदेशी म्हणजे मेड इन चायना आहेत.

वेबदुनिया वर वाचा