जिओचे स्पीड सर्वाधिक

शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (11:27 IST)

देशात 4G सेवा देणाऱ्या प्रमुख चार कंपन्यांमध्ये जिओचं स्पीड सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. जिओचं जुलैमधील सरासरी डाऊनलोड स्पीड 18.65 mbps इतकं असून, ते पहिल्या क्रमांकावर आहे. तर देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
 

भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण अर्थात ट्रायने ‘माय स्पीड’ या पोर्टलवर, जुलै महिन्यातील टेलिकॉम कंपन्यांचं इंटरनेट स्पीड जाहीर केलं आहे. त्यामध्ये जिओचं डाऊनलोड स्पीड 18.65 mbps असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे एअरटेलचं सरासरी स्पीड सर्वात कमी म्हणजे 8.91 mbps इतकं नोंदवण्यात आलं आहे. या यादीत व्होडाफोन 11.07 mbps स्पीडसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 9.46mbps स्पीडसह आयडीय तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वेबदुनिया वर वाचा