फोन हॅक झालाय?

बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (21:08 IST)
आजकाल फोन हॅक होण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. फोन हॅक झाला आहे किंवा नाही हे आपण ओळखू शकतो. आपल्या फोनमधून काही संकेत मिळत असतात. स्मार्टफोनची बॅटरी नेहमीपेक्षा खूप लवकर संपत असेल तर या फोनमध्ये मालवेअर किंवा बनावट अॅप असण्याचा संकेत असू शकतो. काही वेळा फोनच्या बॅगग्राउंडमध्ये सुरू असणार्याण अॅपमुळेही बॅटरी लवकर संपू शकते. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्यासाठी हेही तपासून घ्या. 
 
फोन वारंवर हँग होणं किंवा स्लो होणं हा सुद्धा फोनमध्ये मालवेअर अॅप असल्याचा संकेत ठरू शकतो. काही धोका वाटत असल्यास फोन रिसेट करून घ्या. यामुळे मालवेअर अॅप्स डिलिट होतील. अॅप्स ओपन केल्यानंतर क्रॅश होणं, वेबसाइट ओपन व्हायला बराच वेळ लागणं किंवा साइट वेगळीच दिसणं हे सुद्धा फोन हॅक झाल्याचे संकेत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती