पेटीएमने आपली पेमेंट बँक लॉन्च केली आहे. कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करुन याची माहीती दिली. या नव्या सेवेत पेमेंट बँकेतील जमा रकमेवर खातेदारांना 4 टक्के व्याज मिळणार आहे.रिझर्व बँकेकडून पेटीएमला पेमेंट बँकेचा परवाना नुकता मिळाला असून, यानुसार पेटीएमने ही नवी सेवा सुरु केली. या बँकिंग सेवेच्या माध्यमातून कंपनी 31 ब्रांच आणि 3000 कस्टमर पाईंट सुरु करणार आहे.
पेटीएमने ही सेवा सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली असून, याचा वापर कंपनीचे कर्मचारी आणि काही निवडक व्यक्तींनाच याचा वापर करता येणार आहे. जर पेटीएम यूजर्सना ही सेवा वापरायची असल्यास, त्यांना त्यांच्या पेटीएमवरुन इनव्हीटेशन रिक्वेस्ट पाठवावी लागेल.विशेष म्हणजे, तुम्हाला तुमच्या खात्यावर कमीत-कमी किती पैसे ठेवावे, याचं कोणतंही बंधन नाही. म्हणजे, जर तुमच्या खात्यावर शून्य बँलेन्स असला, तरी त्यावर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. तसेच NEFT आणि RTGS साठीही कसलंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही.पेटीएम आपल्या पेमेंट बँक यूजर्सना Rupay डेबिट कार्ड देणार आहे. ज्यासाठी कंपनी वार्षिक 100 रुपये आणि डिलिव्हरी चार्जेस घेईल. पण कार्ड हारवल्यास यूजर्सना 100 रुपये द्यावे लागतील.