आता व्हाट्सएपवर थांबवू शकता जास्त फॉरवर्ड होणारे मेसेज

मंगळवार, 9 एप्रिल 2019 (12:00 IST)
व्हाट्सएप खोट्या बातम्या कमी करण्याचा प्रयत्नांतर्गत आपल्या ग्रुप सेटिंग्जमध्ये एक नवीन फीचरची तपासणी करत आहे, ज्यामुळे व्हाट्सएप वापरकर्त्यांना जास्त फॉरवर्ड होणारे मेसेज थांबवता येतील.
 
नवीन फीचरची तपासणी - फॉरवर्डिंग इन्फो आणि फ्रिक्वेंटली फॉरवर्ड फीचर्स सध्या उपलब्ध नाही आहे. पण व्हाट्सएप अँड्रॉइडसाठी आपल्या बीटा अपडेटवर या फीचर्सवर कार्यरत आहे. व्हाट्सएप आता 2.19.97 बीटा अपडेटमध्ये ग्रुप्समध्ये एका नवीन फीचरची तपास करत आहे.
 
ग्रुप सेटिंग्जमध्ये मिळेल पर्याय - जे वापरकर्त्यांना ग्रुपमध्ये सर्वात जास्त फॉरवर्ड करण्यात आलेल्या   मेसेजांना रोखण्याची सुविधा देईल. हा पर्याय ग्रुप सेटिंग्जमध्ये मिळेल आणि फक्त ग्रुप ऍडमिनच त्याला बघू शकतील आणि त्याला अॅडिट करू शकतील.   
 
लोक होतील शहाणे - हा फीचर आल्यानंतर कोणतीही व्यक्ती जास्त फॉरवर्ड करण्यात आलेल्या मेसेजांना ग्रुपमध्ये पाठवू शकणार नाही. चार वेळा फॉरवर्ड झाल्यानंतर तो मेसेज या वर्गात येईल. व्हाट्सएपने सध्या भारतात, संदेश अग्रेषित करण्यासाठी अधिकतम सीमा 5 ठेवली आहे. या पाउलामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती