ट्रायच्या नव्या अॅपमुळे डीटीएच आणि केबल युजर्ससाठी चॅनेल निवडीची प्रक्रिया सोपी होणार आहे. अॅपमुळे ग्राहक आपल्या आवडीचे चॅनेल निवडू शकणार आहेत, सोबतच यावेळी त्यांना यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचीही माहिती मिळेल. सुरुवातीला तुम्ही अॅपच्या सहाय्याने चॅनेल्स निवडा. यानंतर अॅप तुम्ही निवडलेल्या चॅनेल्सची यादी दाखवेल. एकदा निवड संपली की अॅप तुम्हाला यासाठी किती पैसे मोजावे लागतील याची माहिती देईल.
हे अॅप वापरण्यासाठी ट्रायच्या बेवसाइटवर जावं लागेल. चॅनेल सिलेक्शन पेजवर जाण्यासाठी वेबसाईटवर खालील बाजूला असणाऱ्या ‘Get Started’ बटणावर क्लिक करुन काही सोप्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तुमचं नाव, पत्ता, कोणते चॅनेल पाहण्यास आवडेल अशा प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुमच्यासमोर चॅनेल्सची यादी येईल. युजर्स आपल्याला हवे ते चॅनेल्स यावेळी निवडू शकतात. तुमच्या निवडीच्या आधारे ट्राय यासाठी किती पैसे मोजावे लागतील याची माहिती देईल.