सौ. फडणवीस यांचा गाण्यांचा नवा अल्बम, टीझरची युट्यूबवर धूम

सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (07:59 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गाण्याच्या अल्बमच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘तेरी बन जाऊंगी’ असं या गाण्याचं नाव असून टी सीरिजने त्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. या टीझर व्हिडीओला युट्यूबवर ५० हजारांहून अधिक व्हयूज मिळाले आहेत. हे गाणं ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती