सार्वजनिक ठिकाणी फुकटात फोन चार्ज केला, तर डाटा हॅक होऊ शकतो

सोमवार, 1 मे 2017 (10:20 IST)
तुम्ही जर विमानतळ, मेट्रो स्टेशन, रेस्टॉरंट आणि मॉल सारख्या सार्वजनिक ठिकाणी तुमचा मोबाइल चार्जिंगला ठेवत असाल तर जरा जपून. कारण या सार्वजनिक ठिकाणी तुमचा मोबाइल डाटा हॅक होऊ शकतो. मोबाइल चार्जिंगला ठेवताच अवघ्या काही मिनिटात तुमचा मोबाइलचा डाटा हॅक होईल आणि तुम्हाला कळणारही नाही. तेव्हा फुकटात मोबाइल चार्जिंग करायला जाल तर सावधान! 
 
​‘न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्जिंगच्यावेळी हॅकर्स डाटा ट्रॅक करण्यासाठी एका साइड चॅनलचा वापर करतात. यात कोणतीही वायर न लावता पर्सनल माहिती काढली जाते. विशेष म्हणजे फोन जितका वेळ चार्ज केला जाईल तेवढा डाटा काढून घेतला जातो. म्हणजे फोन १०० टक्के चार्ज झाला असेल तर डाटा जलदगतीने हॅक केला जात असल्याचे या संशोधनातून पुढे आले आहे.
 
 युएसबीद्वारे फोन चार्जिंग केल्यास मोबाइल डाटा हॅक होण्याची शक्यता अधिक असते. मोबाइलचा इलेक्ट्रीक पोर्टस सुरक्षित असतो. युएसबी डाटा कधीच सुरक्षित नसतो, असे देश-विदेशात काम करणाऱ्या एका हॅकर्सने सांगितले. मेट्रोत तुम्ही बिनधास्त चार्जिंग करू शकता. पण मेट्रोतील सिस्टीम कुणी हॅक केली का? हे मात्र सांगता येणे कठीण आहे. नुकतेच मेट्रो स्टेशनला हॅक करून पोर्न फिल्म चालवण्यात आली होती. त्यावरून मेट्रो स्टेशनमध्येही चार्जिंग करणे धोकादायक होऊ शकते हे यावरून स्पष्ट होत आहे.

वेबदुनिया वर वाचा