मायक्रोसॉफ्टने त्यांच्या लेटेस्ट डेस्कटॉपसाठी ब्ल्यू टूथ की बोर्डवर संशोधन केले असून हा की बोर्ड स्पेशल असेल. म्हणजे त्याच्यावर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. मायक्रोसॉफ्टने त्याचे नामकरण मॉडर्न की बोर्ड असे केले असून त्याचे कोडनेम आहे सी 3 के 1780. शांघाय येथे होत असलेल्या कंपनीच्या इव्हेंटमध्ये या की बोर्डचे प्रात्यक्षिक दिले जाईल असा अंदाज व्यक्त होत आहे. विंडोज टेन पुशसह हा की बोर्ड फिट करण्याची कंपनीची योजना आहे. हा की बोर्ड सरफेस की बोर्डप्रमाणेच असेल.