शाओमीने भारतात लॉन्च केलं स्मार्ट एलईडी बल्ब, मोबाइलने करता येईल नियंत्रित

गुरूवार, 25 एप्रिल 2019 (13:03 IST)
शाओमी इंडियाने भारतात रॅडमी वाई3 आणि रॅडमी 7 सह एमआय स्मार्ट बल्ब लॉन्च केलं आहे. एमआयच्या या स्मार्ट बल्बमध्ये व्हर्च्युअल असिस्टेंट अॅमेझॉन अॅलेक्सा आणि गूगल असिस्टेंट दोन्हीचा स्पोर्ट मिळेल. यात 16 लाख रंग आहे आणि त्याचे आयुष्य 11 वर्षे एवढे आहे. हे बल्ब एमआय होम अॅपद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात. त्याची विक्री लवकरच कंपनीच्या वेबसाइटवरून अर्थात 26 एप्रिलपासून क्राउडफंडिंग
कार्यक्रमात होईल, तथापि कंपनीने सध्या याच्या किंमतीबद्दल काहीच माहिती दिली नाही आहे.
 
Mi LED स्मार्ट बल्बचे फीचर्स - या बल्बची क्षमता 10 वॅट्स आहे. या बल्बसह होल्डर आपल्याला वेगळ्याने विकत घ्यावा लागेल. हे एमआय होम अॅपद्वारे नियंत्रित केले जाईल, तथापि या बल्बसाठी आपल्याला वाय- फाय आणि ऊर्जेची आवश्यकता असेल. अॅपद्वारेच बल्बचे रंग बदलता येतील. तसेच हे ऑन आणि ऑफ देखील करता येतील. या बल्बमध्ये आपण बल्बचा रंग किती वेळेनंतर बदलता येईल हे देखील सेट करू शकता.
 
या बल्ब व्यतिरिक्त शाओमीने रॅडमी वाय3 आणि रॅडमी 7 देखील लॉन्च केले. यापैकी रॅडमी वाई 3, रॅडमी वाई 2 चा अपग्रेडेड व्हर्जन आहे तर रॅडमी 7, रॅडमी 6 चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. रॅडमी वाई3 ची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये आणि रॅडमी 7 ची 7,999 रुपये एवढी आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती