FB: मार्क झुकरबर्ग कहून सेन्सॉर बोर्डाची स्थापना

शनिवार, 6 मे 2017 (12:44 IST)
जगभरातील लोक एकमेकांशी जोडले जावेत, मतांची, विचारांची देवाणघेवाण व्हावी, जगभरातील घडामोडींची माहिती मिळावी, यासाठी फेसबुकची निर्मिती झाली होती. पण काही लोक त्याचा गैरवापर करताना दिसतात.
 
हा गैरप्रकार रोखण्यासाठी 3 हजार लोकांचा सेन्सॉर बोर्ड नेमल्याचे मार्क झुकरबर्गने सांगितले. “त्यामुळे यापुढे जर आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा पोस्ट फेसबुकवर टाकल्या तर त्याचं अलर्ट सेन्सॉर बोर्डाला मिळेल.
 
जर ती पोस्ट किंवा व्हिडीओ आक्षेपार्ह असेल तर अशा पोस्ट फेसबुकवर अपलोडच होणार नाहीत,” असं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं.

वेबदुनिया वर वाचा