सर्च इंजिन गुगलने अनुवादाच्या अॅपमध्ये आणखी सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे.
ज्या भारतीय भाषांसाठी गुगल ट्रान्सलेट अॅपची सेवा सुरू केली आहे. त्यात बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामिळ, तेलुगु व उर्दू या भाषांचा समावेश आहे. अॅण्ड्रॉइड व आयओएस स्मार्टफोनमध्ये या अॅपचा उपयोग करता येईल. ही सुविधा आॅफलाइनही असणार आहे. म्हणजेच इंटरनेट नसतानाही या फिचरचा उपयोग केला जाऊ शकतो. मात्र, हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे.