सुत्रांच्या मते, एअरटेलचा 4जी स्मार्टफोन दिवाळीच्या आधीच बाजारात येऊ शकतो. या फोनसोबत कंपनी अनेक आकर्षक टेरिफ प्लॅन देण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम, चार इंच डिस्प्ले, ड्यूल कॅमेरा असे फीचर असू शकतात. यासोबतच 1 जीबी रॅमही यात असेल. पण या स्मार्टफोनची बुकींग कधीपासून सुरु होणार याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, एअरटेलने मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, जिओचा फीचर फोन हा चक्क फुकटात मिळणार आहे. पण या फोनसाठी 1500 रुपये डिपॉझिट द्यावं लागणार आहे. हे पैसे ग्राहकांना तीन वर्षांनी परत मिळतील.