अशा लोकांना वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही -मोदी

सोमवार, 11 सप्टेंबर 2017 (13:13 IST)
आपल्याला खरंच वंदे मातरम् म्हणायचा हक्क उरला आहे का, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील अपप्रवृत्ती आणि चुकीच्या गोष्टींवर जोरदार हल्ला चढवला. निमीत्त होत स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील भाषणाला १२५ वर्ष पूर्ण झाल्याचं.
 
स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील भाषणाला १२५ वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत सोमवारी ‘स्टुडंट लीडर्स कन्वेंशन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्याला खरंच वंदे मातरम् म्हणायचा हक्क उरला आहे का हे स्वत:ला विचारला पाहिजे.किंबहुना वंदे मातरम् उच्चारण्यापूर्वी १०० वेळा विचार केला पाहिजे,देशातील अनेक लोक रस्त्यावर थुंकतात, रस्त्यावर कचरा फेकतात. भारतमातेची अशाप्रकारे अवहेलना करणाऱ्या या लोकांना वंदे मातरम् म्हणायचा काहीही अधिकार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती